Friday, November 20, 2026

 लपाछपीचा खेळ 

असतो मोठा गंमतीचा 
डोळे मिटले कि 
लोकं  जातात लपून 

आपण शोधत राहायचे
लोकांना . स्वतःला 
कधी सापडतो रस्ता 
कधी चाचपडत राहावे लागते 

हाताला लागलेच कोणी 
तर सुटते एक जबाबदारी 
हाताला लागला स्वतःचाच हात 
तर शोधावे लागतात नवे मार्ग 

नव्याने शोधावे स्वतःला 
यातच संपते एक राज्य 
येतो तुझा हात हातात 
एक खेळ संपलेला असतो एका जन्मात 

No comments:

Post a Comment