Friday, November 20, 2026

तू आयुष्यात आलाच नसतास तर 

मी शोधू नसते शकले आरशातल्या प्रतिमेला, 


तू आयुष्यात आलाच नसतास तर 
मला नसती सापडली वाट मला भेटवणारी, 

तू आयुष्यात आलाच नसतास तर  
मला नसता  मिळाला मंत्र आनंदी राहण्याचा, 
 
तू आयुष्यात नसतास तर पुरे आता कल्पना, 
तू नसतास तर मी ही नसते साधे वास्तव बरे 
 
 

No comments:

Post a Comment