Thursday, February 7, 2019

अनाघ्रात

मी झोपले असते अनावृत,
तुझ्या मिठीत
आसक्त वाट पाहत
सुखाच्या अत्युच्च क्षणाची,

तू ही असतोस त्याच
सुखाच्या शोधात

खरेतर ही वाट नसतेच मुळी कुणा एकाची
सोबतीनेच तर शक्य होते ती

तरीही तू जातोस पुढे एकटाच,
ठरवतोस शेवटचा थांबा,
आणि संपवतोस आपला प्रवास

मी तशीच मागे असते,
एकटीच,

तुझ्याच मिठीत
अर्धवट संपलेल्या रस्त्यात
शोधत असते,

बलात्काराचा उलट अर्थी शब्द !!!

मानसी होळेहोन्नूर
#मानसी #कविता #manasitales



No comments:

Post a Comment