Friday, November 20, 2026

सगळं काही आवरून

मिठीतून स्वतःला अलगद काढून घेताना
तिचा हात असतो त्याच्याच हातात

हात काढून घेताना डोळे बोलतात
अभी ना जाओ छोडकर, 
के दिल अभी भरा नही

निग्रहाने ती उठते,
विस्कटलेले केस, मन गोळा करते
आणि मग गुणगुणत राहते

तुमसे मैं जुदा नही
मुझसे तुम जुदा नही

दर भेटीत असेच होत राहते
फक्त कधी तिच्या ओळी तो म्हणतो
किंवा त्यांना काही म्हणावंच लागत नाही

No comments:

Post a Comment