Tuesday, March 7, 2017

ती आहे पूर्णत्व…पुरूषाचं....

१. 

लहानपणी आजीकडून त्यांनी एक गोष्ट ऐकली होतीबृहन्नडेची. अर्जुनासारखा शूरवीर धनुर्धारीमहापुरुष एका वर्षासाठी स्त्री होतो त्याची कथा. दहा बारा वर्षाचा असताना ऐकलेली ती गोष्ट. रामकृष्ण यांच्या मैत्रीच्या पराक्रमाच्या गोष्टीनी भारून जायचं वय होतं ते. तोपर्यंत प्रत्येक खेळात त्याला राम किंवा कृष्ण व्हायचं होतं. कृष्णच जास्त. त्याची ती बासरी वाजवणंगोपिकांसोबत मस्ती करणं हे सारंच आगळावेगळ वाटायचं. त्याचा धोरणी चतुरपणासोयीस्कर सबबी  सारं काही मानवी वाटायचं. मग अशातच कधी तरी पांडवांचीत्यांच्या कथाविश्वात एन्ट्री झाली.  पाच भावांमध्ये मिळून एकच बायकोपाच भाऊ पण.  प्रत्येकाचा जन्मदाता वेगळा कसा, असा प्रश्न पडायचा. पण आजी पुढे विचारायची हिंमत कधी झाली नाही. मग अशातच एकदा कधी तरी आज्जीनी बृहन्नडेची गोष्ट ऐकवली आणि मग पुढचे कित्येक दिवस महिने ती डोक्यातच घुमत होती. उर्वशीनी शाप दिला म्हणून अर्जुनाला एक वर्ष स्त्रीवेश घालून स्त्रियांच्या अंतःपुरात राहायचंनृत्यशिकवायचं सोपं नक्कीच नव्हत. मग कसं काय त्यानी निभावून नेलं असेल. काय विचार आले असतील त्याच्या मनातबाईच्या आयुष्याची कल्पना आली असेल कात्या एका वर्षाच्या अनुभवामुळे अर्जुनाचा स्त्रियांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला असेल काहे प्रश्न त्या वयात पडले नाहीत. पण एक बालसुलभ प्रश्न पडला होता,अर्जुनाकडे फक्त त्याचे कपडे होते मग त्यानी मुलींचे कपडे कुठून आणलेया प्रश्नावर आजी खूप हसली होती आणि तिनी पुढचे आठ दहा दिवस येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला ऐकवलं होतं. मुलगा म्हणून वागत असताना देखील कुठे तरी ती गोष्ट आत होतीच. अर्जुनाला स्वतःच्या रूपाचा,पौरुषत्वाचा अभिमान होतातो गळावा म्हणून तर दिला गेला नसेल ना हा शापअसंही कधी कधी मनात उगाचच डोकावून जायचं.
समाजरितीप्रमाणे शिक्षणनोकरीलग्न सारं झालं. एक मुलगा भाऊनवरावडील सारं काही निभावून नेताना त्याच्या डोक्यात ती बृहन्नडा असायचीच. कित्येक वेळा त्याला निर्णय घेताना ती बृहन्नडा अप्रत्यक्षपणे मदत करायची. त्याच्या बायकांबद्दलच्या हळव्या कोपऱ्यामुळे त्याला बाईल्या म्हणूनही कधी हिणवलं गेलंकधी बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हटलं गेलं, पण त्याला माहीत होतं, पुरुषामध्ये दडलेल्या स्त्रीचा सन्मान जपला तरच माणूस म्हणवून घेण्यात अर्थ आहे.
त्यामुळेच स्त्री म्हणून जगुनही अर्जुनाच्या पुरुषत्वाला कोणी कधी बोल लावला नाही.

२.
आपण वेगळे आहोत हे त्याला जसं जसं उमगत गेलं, तसा तो त्याच्या चित्रांमध्ये जास्त रमत होता. आपलं दिसणं जेव्हा आपल्याला चुकीचं वाटतं. आपल्या ओळखीचा शोध घेत असताना काहीतरी वेगळंच कळत जातं. स्वतः बद्दल नवे शोध लागत असताना तो सगळ्याच आघाड्यांवर लढत होता. पहिले स्वतःशीमग कुटुंबाशीसमाजाशीअनेक समजांशी. एक हात मदतीसाठी मिळत असताना दहा हात उगारले जात होते.  त्या सगळ्या मंथनातून एक होत होतं स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तो अभ्यासात अव्वल येत होता. सोबतीला चित्रं होतीच. खूप छोट्या छोट्या इच्छा तो मारत होता पुढचा विचार करून. घरात कोणीही नसताना एकदा तो आईची साडी नेसला. हातात बांगड्या घातल्याछोटीशी टिकली लावून पाहिली. हलकासा मेक अप सुद्धा केला. बोटांवर नेल पॉलिश लावताना जणू तो स्वतःलाच पॉलिश करत होता. स्वतःला तयार करत असताना त्याचा रोम रोम फुलत होता. आरशामाधलं स्वतःच प्रतिबिंब पाहून स्वतःशी नव्यानं ओळख करून घेत होता. लहानपणापासून त्याला हे  आईसारखे कपडे घालावेसे वाटायचे. नटावंसं वाटायचंस्वतःला एकदा तरी मुली सारखं तयार करून आरशात बघायचं हे त्याचं वर्षानुवर्षाचं एक छोटंसं स्वप्न होतं. ते एक छोटंसं स्वप्न पूर्ण करायला त्याला काही वर्ष लागली होती. आपल्याला जे वाटतं ते नक्की काय आहे हे समजण्यात त्याची पौगंडावस्थेतील वर्ष गेली होती. आणि जेव्हा ते कळलं तेव्हा बाकीचे हे कसं काय स्वीकारतील याची भीती होती. पण हळू हळू स्वतःलाच तो कणखर बनवत गेला. स्वतःबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल लाज सोडून सगळं काही वाटत होतं त्याला. पुरुषाच्या आत स्त्री लपलेली असतेच ना. मग मला आतून वाटणाऱ्या या हाकेला मी का नाही उत्तर द्यायचं. ही केवळ विचारांच्या पातळीवर राहिलेली बंडखोरी त्याला पुरेशी वाटत नव्हती. एकदा तरी पूर्ण स्त्री वेशात त्याला स्वतःला भेटायचं होतं. आपण आहे तसचं राहावंपेहराव बदलावा की शस्त्रक्रिया करावीया साऱ्या खूप पुढच्या गोष्टी होत्या. त्याला फक्त एक इच्छा पूर्ण करायची होती. जेव्हा ती इच्छा पूर्ण झाली तेव्हा त्याचं स्वतःवरचजगावरच प्रेम अजूनच वाढलं होतं.
आपल्याला जे वाटतंय त्यात अनैसर्गिक काहीही नाही. कणखरपणाभावना हे सारे लिंग विरहित असतातपण तरीही काही भावनांना स्त्रीत्वाचं लेबल लावून वेगळ बसवलं जातं. पण निसर्गतः सगळे सारखेच असतात. स्त्रीच्या आत पुरुष दडलेला असतो तर पुरुषांच्या आत स्त्री असते च कारण ह्या दोन जाती नाहीत तर त्या अंतःप्रेरणा असतात.

३.

तिनी विचारलं," बाबा women’s day असतो तसा men’s day का नसतो?"

निरागसतेच्या सुखी वयातून पार होत अल्लड तारुण्याच्या अधल्या मधल्या टप्प्यावर येत असलेल्या आपल्या लेकीला खर सांगावं की गोल गुळगुळीतथातूर मातुर उत्तर द्यावं या संभ्रमात बापानी दोन क्षण घालवले आणि मग तिचा हात हातात घेऊन म्हणाला.


अग बाई होणं काही सोपं नसतं. सतत दुसऱ्याचा विचार करून जगणं म्हणजे असतं बाई पण. कोणत्याही परिस्थितीत उभं राहणं म्हणजे असतं बाईपणशून्यातून नव्याची सुरुवात करून विश्व वसवणं म्हणजे असतं बाई पणउद्याचाच नाही तर परवाचा तेरवाचा विचार करून निर्णय घेणं म्हणजे असतं बाई होणंनाती जन्माला घालून ती जोपासणं असतं बाईपणसृजनाचा शोध घेत राहून आयुष्य सुंदर करणं असतं बाईपण,विश्वासावर विश्वास ठेवून विश्वास सार्थक करणं म्हणजे असतं बाईपणकितीही अंधार असला तरी प्रकाशाचे कान शोधणारी असते ती बाई,स्वतःची क्षमता माहित असूनही कमी लेखण म्हणजे असते बाईपण. पण कधीतरी स्त्री स्वतःची ओळख विसरतेस्वतःवरच्या अन्यायाला समाजव्यवस्थेचा न्याय समजायला लागतेकर्तव्य पार पाडता पाडता हक्क विसरून जाते तेव्हा तिला जागं करावं लागतंतिला सांगावं लागतं. बाई तू कमी नाहीस. सृष्टीचा आधार आहेस तू. तुझ्या पायावर तर उभा आहे हा सारा डोलारा. तुझी सहनशक्ती हा तुझा कमकुवतपणा नाही तर शक्ती आहेतुझं समर्पण तुला इतरांपेक्षा वेगळ ठरवतं. तुझा सृजनाचा शोध हा खरंतर कारण आहे आपल्या सुखी जीवनाचं. पुरुषाशी बरोबरी करणं म्हणजे सगळं मिळवणं नसतंपुरुषाच्या बरोबरीनं उभं राहणं म्हणजे असतं बाईपण. स्त्री फक्त बाई नसते ती बाई माणूस असते. त्या बाईमाणूस पणाला जगणं म्हणजे असतं बाईपण. बयो सोप्प नसतं बाई होणंबाई व्हावसं वाटणं. ती एक जबाबदारी असते माणूस पण समृद्ध करण्याचीआयुष्य सुंदर करण्याचीजगात सुख फुलवण्याची. ही सगळी स्वप्न पाहणाऱ्याती प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास घेणाऱ्या राकट कणखर हातांवर उब धरण्यासाठीचा हा एक दिवस. बाई असण्याचा अभिमान जागवण्याचा एक दिवस.
बाप बोलतच होताकाही लेकीसाठी काही स्वतःसाठीतिला कितपत कळत होतं माहित नाहीपण त्याला International Women’s Day नव्यानी कळत होता इतकं नक्की.
बाबा म्हणजे हा day तुमचा पण आहे कीबघ women मधे men आहेच किंवा female मधे male आहेच की. म्हणजे बाई माणसाला पूर्ण करते असंच तुला मगाचपासून म्हणायचं होतं ना. 
इतक्या साध्या  सोप्या शब्दात आयुष्याचं सार मांडू शकणाऱ्याजगणाऱ्या, तमाम स्त्रियांनास्त्रीत्वाचं भान असणाऱ्यांना सगळ्यांना  जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा....   

No comments:

Post a Comment