Sunday, January 24, 2016

अल्प मृत्यू

आता येणार नसतो फोन,
आता येणार नसतो एखादा आपुलकीचा मेसेज,
आता होणार नसते भेट
आता खरे तर वाटत नसते भीती, कोणीतरी कान उपटण्याची
आता आदर बाळगावा असे उरलं नसते फारसे
आता संपली असते उत्सुकता पहिल्या प्रतिक्रियेची
आता उडून गेलं असतं बालपण एका क्षणात
आता आता उरलेलं असतात शब्द
जपलेल्या आठवणी, काढलेले फोटो
असं कसं जाऊ शकतं कोणी
ही शुद्ध फसवणूक आहे, 
एक मृत्यू सोबत घेऊन जातो कित्येक जणांच्या आयुष्यातील येऊ न शकलेले कित्येक सोनेरी क्षण,
आणि कित्येकांचा नकळत झालेला अल्प मृत्यू


2 comments:

  1. ही शुद्ध फसवणूक आहे >>> yes. true.

    ReplyDelete
  2. खरंच जाणारा जातो, आणि आपण चुतुपुटत राहतो

    ReplyDelete